डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण; अहमदनगर; केडगाव येथे सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय ...
डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण;
अहमदनगर;

केडगाव येथे सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय व आर्किटेक इंजिनीअरिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने डॉ.हेडगेवार शैक्षणिक संकुलात ग्रीन रिव्हॉल्युशन उपक्रमाच्या माध्यमातून झाडे लावा, निसर्ग वाचवा या उद्देशाने शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगर शहराचे उपमहापौर श्रीपाद छिंदम , नगरसेवक दिलीप सातपुते, संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण , कोषाध्यक्ष अरुण धर्माधिकारी , उद्योजक सतीश झिकरे, प्रा.डॉ.चोभे, मुख्याध्यापक रोहिदास जाधव, दादासाहेब काजळे ,दत्ताजी जगताप, मकरंद देशपांडे, अजय दगडे, तांदळे सर,आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचे प्रमुख प्रसाद जमदाडे माहिती देताना म्हणाले, हा उपक्रम शाळेच्यावतीने मागील वर्षीच सुरू करण्यात आला आहे. निसर्ग वाचवण्यासाठी त्याचे पुनर्जीवन करून हरितक्रांती करावयाची आहे या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीसाठी प्रबोधन व्हावे असा ड्रेस कोड देण्यात आला आहे . आज शाळेच्या आवारात ४0 झाडे लावण्यात आले. त्यांची निगा राखणो, पाणी देणो व जगवणो हे काम ते करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता क्षीरसागर तर आभार प्रदर्शन स्मिता खिलारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी प्रय▪केले.









