'देशाला सुजलाम-सुफलाम करण्याची जबाबदारी सर्वांची; अहमदनगर नगरमधील लक्षवेधी नागरिक सेवा संघटना व राजहंस वर्तमानपत्र कात्रण...
'देशाला सुजलाम-सुफलाम करण्याची जबाबदारी सर्वांची;
अहमदनगर

नगरमधील लक्षवेधी नागरिक सेवा संघटना व राजहंस वर्तमानपत्र कात्रण संग्राहलयाच्यावतीने ईद मिलन समारंभाचे आयोजित करण्यात आले होते. गेल्या ३६ वर्षांपासून संस्थांतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात हिंदू-मुस्लिमांसह सर्व जातीचे, धर्माचे नागरिक उत्साहात सहभागी होत असतात. या वर्षीच्या झालेल्या ईद मिलन समारंभात शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींना गौरविण्यात आले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, मौलाना अन्वर नदवी यांच्या हस्ते सामाजिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक, साहित्य, कला, वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कुतबुद्दीन शेख हे गेल्या ३६ वर्षांपासून पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.
यावेळी मौलाना अन्वर नदवी म्हणाले, भारत हा सर्व जाती धर्माचा देश आहे. मात्र जातीवाद, भ्रष्टाचार, आतंकवादामुळे पोखरला जात आहे. भारताला पुर्नवैभव प्राप्त करण्यासाठी व सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
सुभाष गुंदेचा म्हणाले, नगर शहरामध्ये हिंदू-मुस्लिम समाजामध्ये सौख्य वर्षानुवर्षे टिकून आहे. गणपती, मोहरम, दिवाळी, रमजान सारखे मोठ्या सणांना हिंदू-मुस्लिम नागरिक उत्साहात एकत्र येत असतात.
यावेळी लॉयर सोसायटीचे चेअरमन अँड़रवींद्र शितोळे, डॉ.डी.पी.शेख, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ग्राहक मंचाचे शिरिष बापट, प्रा.नवनाथ वाव्हाळ आदिंनी यावेळी आपले विचार मांडले.









