छात्रतेज राष्ट्रकार्यासाठी समर्पित व्हावे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पारनेर तालुका अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पारनेर तालुक...
छात्रतेज राष्ट्रकार्यासाठी समर्पित व्हावे
-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पारनेर तालुका
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पारनेर तालुक्याच्या वतीने ९जुलै हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे विद्यार्थी संघटन आज जगातील सर्वात विशाल संघटन आहे. अभाविप च्या निघोज व पारनेर शहर शाखांच्या वतीने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. श्री मुलिकादेवी महाविद्यालय,निघोज तसेच न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर येथे विद्यार्थ्यांना शुभेच्छा पत्रांचे वाटप करण्यात आले.या शुभेच्छा पत्रात अभाविप च्या कार्यक्रमांचे स्वरूप,महाविद्यालयाचे तासिका वेळापत्रक,शुभेच्छा संदेश यांचा समावेश आहे.
अभाविप च्या वतीने १००० विद्यार्थ्यांना गिफ्ट व्हाऊचर्स वाटण्यात आली. या गिफ्ट व्हाऊचर्सवर मालपाणी उद्योगसमूहाच्या वॉटर पार्कमध्ये विद्यार्थ्यांना २५% सवलत मिळणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी या सवलतीचा फायदा घ्यावा,असे आवाहन अभाविप ने केले आहे. विद्यार्थी दिन यशस्वी करण्यासाठी अभाविप च्या निघोज शहरमंत्री कु.वैभव गाडीलकर, पारनेर शहरमंत्री कु महेश ठुबे,महाविद्यालयीन अध्यक्ष वैभव सरडे,रोहीत कोल्हे,अविनाश जगदाळे,मिनीनाथ इरोळे,अमोल गाडीलकर,अमोल साठे,अवि येवले,ऋषी खोसे,भरत गाडीलकर,कनिष्ठ महाविद्यालयीन अध्यक्ष कु.भास्कर लंके,संदेश घोगरे,अमर भंडारी,संचित भालेकर,तालुकाप्रमुख गणेश लंके यांनी प्रयत्न केले.पारनेर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार असल्याची ग्वाही अभाविप चे जिल्हा संयोजन समिती सदस्य , तालुकाध्यक्ष प्रा.राजू पानमंद यांनी दिली.










