'रामकृष्ण'चा हाऊस पदग्रहण उत्साहात अहमदनगर श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कनिष्ठ महा...
'रामकृष्ण'चा हाऊस पदग्रहण उत्साहात
अहमदनगर

श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे रामकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात हाउस पदग्रहण कार्यक्रम उत्साहात झाला. पहिली ते दहावींच्या विद्यार्थ्यांची चार गटात विभागणी करून दररोज प्रार्थनासभेत विविध विषयांचे सादरीकरण केले जाण्याचे नियोजन करण्यात आले. शाळा प्रतिनिधी म्हणून रवीराज जाधव याची मुलांमधून, तर ज्ञानेश्वरी शिंदे हिची मुलींमधून बिनविरोध निवड करण्यात आली.
पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची निवड करण्यात आली. अध्यक्ष गीता गिल्डा, उपाध्यक्ष राधिका जेऊरकर व उमा शाम जोशी, सचिव सावित्री पुजारी, सहसचिव रुपाली शिंगवी व वैशाली चोभे यांची निवड करण्यात आली. पालक प्रतिनिधी : शीतल मोढवे, पायल गांधी, पौर्णिमा कोठारी, शारदा कनोजिया, मानसी पडोळे, प्रिया बोगावत, रिना जाधव, सुवर्णा डेरे, सुवर्णा सासवडे, विनया गांधी, गौरी बिबवे, रुपाली शिंगवी, दिपाली मुंडलिक, मनीषा घोरपडे, लीना जोशी, स्वाती कडूम. शिक्षक प्रतिनिधी : वैशाली चौभे, सीमा पुरोहित, सपना मंत्री, दमयंती रासने, प्राजक्ता नगरकर, प्रिया कासलीवाल, ज्योती रासकर, प्राजक्ता जाजू प्राजक्ता, कोमल शेटे, कंचन शुक्ला, तृप्ती कालिया, कश्मिरी म्हेत्रे, तबसुम शेख, मंजूश्री वांढेकर, रोथेल लोंढे, गीतांजली मोथ.









