वीस हजार लिटर डिझेलचे नुकसान करंजी घाटात टँकर दरीत उलटला, एक जखमी; पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे बधवारी मध्यरात्री पुण्याहू...
वीस हजार लिटर डिझेलचे नुकसान
करंजी घाटात टँकर दरीत उलटला, एक जखमी;
![]()
पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे बधवारी मध्यरात्री पुण्याहून शेवगावकडे वीस हजार लिटर डिझेल घेवून जाणारा टँकर चालकाचा ताबा सुटल्याने खोल दरीत जावून पडला. यामध्ये टँकर मधील डिझेल पूर्णपणे वाया गेले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुण्याकडून शेवगावकडे बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वीस हजार लिटर डिझेल घेवून हा टँकर जात होता. तो करंजी घाट उतरत असताना टँकरचालकास समोरील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा टँकरवरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर सरळ एका खोल दरीत जावून पडला. यामध्ये टँकरची टाकी फुटल्याने सुमारे वीस हजार डिझेल वाया गेले आहे. या अपघातात टँकर चालकास जबर मार लागला असून, त्यास नगरला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच दुसर्या दिवशी सकाळी डिझेल काढण्यासाठी काहींनी या परिसरात गर्दी केली. मात्र स्थानिक पोलिसांनी विरोध करताच सर्व डिझेल डोंगरात वाहून गेले.
|










