Archive Pages Design$type=blogging

कोपर्डी, कुळधरण कायमस्वरुपी पोलिस चौकीचे प्रस्ताव

कोपर्डी, कुळधरण कायमस्वरुपी पोलिस चौकीचे प्रस्ताव : रहाटकरशाळकरी मुलींना एसटी बसचे पासेस् अन् पोलिस संरक्षण देणारअहमदनगर; कर्जत ता...



कोपर्डी, कुळधरण कायमस्वरुपी पोलिस चौकीचे प्रस्ताव : रहाटकरशाळकरी मुलींना एसटी बसचे पासेस् अन् पोलिस संरक्षण देणारअहमदनगर;
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खुनाच्या निर्दयी घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कोपर्डी व कुळधरण येथे कायमस्वरुपी पोलिस चौकी उभारण्याचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. गावातील भयग्रस्त शाळकरी मुलींचे समुपदेशन करून त्यांना एसटी बसेस्चे पासेस् देऊन वेळ पडल्यास महिला पोलिस संरक्षण देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना सूचित केले.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे इयत्ता ९ वीत शिकणार्‍या शाळकरी मुलीवर पाशवी अत्याचार करून अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला. या घटनेमुळे राज्यात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून, महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोपर्डीला भेट देऊन तेथीलपरिस्थितीची पाहणी करून गावातील महिला व मुलींचे समुपदेशन केले तसेच यामुळे मुलींना निर्भय बनविण्यासाठी आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पोलिस प्रशासनाकडून दामिनी पथक व निर्भया पथकाची नियुक्ती करून शाळकरी तसेच कॉलेजच्या मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. पोलिसांनी केवळ तक्रारीची वाट न पाहता काही छेडछाडीचे अनुचित प्रकार पुढे आल्यास तत्काळ प्रतिबंध करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी बोलताना रहाटकर म्हणाल्या की, ही घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे व्यथित झालेल्या पीडित मुलीच्या आईची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगताना त्यांनाही गहिवरुन आले. पीडित मुलीचे वडील आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथेही जाऊन त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात पाठवून जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात येणार असून, सरकार पक्षातर्फे अँड़उज्‍जवल निकम काम पाहणार आहेत. आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी प्रय▪केले जाणार आहेत.
या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मुलींना निर्भय करण्यासाठी आत्मनिर्भय प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्वकुलगुरुंची बैठक येत्या ५ ऑगस्टला मुंबईत आयोजित करण्यात आली असून, त्या बैठकीत शाळा, कॉलेजनिहाय कमिट्या स्थापन करण्यात येऊन त्या कमिटीतील सदस्यांवर दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर या कमिटीतील सदस्यांची दर महिन्याला बैठक घेण्यात येऊन शिक्षकांसाठी बंधने घालण्यात येतील. या कमिट्यांच्या अहवालावरुन राज्य महिला आयोग नियंत्रण ठेवणार आहे.
या घटनांना कायद्याने नव्हे तर तर सामाजिक मूल्ये ठरवावी लागणार असून, छेडछाडीच्या प्रकारांना वेळीच लगाम घातल्यास त्या घटनांना पायबंद बसेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना रहाटकर म्हणाल्या, गावातील शाळकरी मुलींशी संवाद साधला असून, त्यांच्यातील भिती दूर करण्याचा प्रय▪करण्यात आला आहे. पालक, मुलींमध्ये सुसंवाद वाढीस लागल्यास त्यांच्यात विश्‍वास निर्माण केला जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासन व खाजगी शिक्षण संस्थांचालकांशी चर्चा करण्यात येणार असून, मुलींचे समुपदेशन करण्याबरोबरच 'स्वयंसिद्धा' क्लासेस् सुरु करण्यात येणार आहेत.

या पत्रकार परिषदेला महिला चळवळीच्या कार्यकर्त्या मंगला खिंवसरा, मानसोपचार तज्ज्ञ मृणाली देशपांडे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा विद्ये उपस्थित होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: कोपर्डी, कुळधरण कायमस्वरुपी पोलिस चौकीचे प्रस्ताव
कोपर्डी, कुळधरण कायमस्वरुपी पोलिस चौकीचे प्रस्ताव
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_83.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_83.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago