वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप; अहमदनगर; भिंगार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे भिंगार येथील बहुजन शिक्षण संघाचे भीमा गौतमी व...
वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप;
अहमदनगर;
![]()
भिंगार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे भिंगार येथील बहुजन शिक्षण संघाचे भीमा गौतमी विद्यार्थिनी आश्रमात विद्यार्थिनींना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद उद्योगपती सादिकभाई सय्यद यांच्या हस्ते वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे शहराध्यक्ष संजय सपकाळ हे होते. प्रास्ताविक भीमा गौतमी विद्यार्थिनींच्या अधीक्षका रजनी जाधव यांनी संघाचीमाहिती सांगितली. तसेच अनेक वर्षांपासून संजय सपकाळ विविध प्रकारे मदत करत असल्याचेही सांगितले.
दादाभाऊ कळमकर यांनी आपल्या भाषणात मा. शरद पवार यांनी महिलांना विविध क्षेत्रात ५0 टक्के आरक्षण दिले यामुळे महिला सक्षमपणे काम करु लागल्य. सध्या संगणक युग असून, आपण भरपूर शिकावे, आपले व समाजाचे नाव लौकिक करावे असे म्हणाले. संजय सपकाळ की, म्हणाले देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत महिला पोहोचल्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींसह पोलिस, राजकीय अशा अनेक ठिकाणी महिला काम करीत असून आपण देखील जिद्द चिकाटी ठेवून शिक्षण घ्यावे.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील, भिंगार अर्बन बॅंकेचे संचालक नाथाजी राऊत, अभिजीत सपकाळ, शेख शकील, प्रवीण फिरोदिया, संतोष धीवर, मतिन खान, दीपक लिपाने, अक्षय नागापुरे, असिफ सय्यद, मेहेमुद शेख, शहर जिल्हा संघटक मतिन सय्यद, अजय चाबुकस्वार आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमोच सूत्रसंचालन संतोष धीवर यांनी केले, जाधव मॅडम यांनी आभार मानले.
|










