बाजार समितीत शेतकरीहिताचा कारभार करू: अँड़ ढाकणे अँड़ प्रताप ढाकणो यांची बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना ...
बाजार समितीत शेतकरीहिताचा कारभार करू: अँड़ ढाकणे
अँड़ प्रताप ढाकणो यांची बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना गहिनीनाथ शिरसाट,सीताराम बोरुडे,नारायण धस,बाळासाहेब घुले, वंसत आमटे,कुंडलिक आव्हाड आदी.पाथर्डी/प्रतिनिधी- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पाच वर्षात करण्यात येईल. शेतकर्यांना बाजार समिती आपली वाटेल, असा आदर्श कारभार करू,असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड़प्रताप ढाकणो यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किसन घोरपडे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून एकमताने प्रताप ढाकणो यांची सोमवारी निवड करण्यात आली. बाजार समितीच्या सभागृहात ढाकणो यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ढाकणो बोलत होते. बाजार समितीचे सभापती गहिनीनाथ शिरसाट,उपसभापती विष्णू सातपुते,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, नारायण धस, मधुकर देशमुख,कुंडलिक आव्हाड,राजेंद्र गज्रे, बबन केदार,वंसत आमटे ,बाळासाहेब घुले, सचिव दिलीप काटे आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी ढाकणो म्हणाले, बाजार समिती ही शेतकर्यांची संस्था आहे. येथील पूर्वीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभरामुळे अनेक अडचणी येत आहेत. सभासदांना दिलेल्या पारदर्शक कारभाराची हमी निभावली जाईल. आदर्श बाजार समिती म्हणून नावलौकिक करू. किसन घोरपडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर माझी संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली असली तरी घोरपडे माझे सच्चे सहकारी होते. ते गेल्याचे दु:ख आहेच. या वेळी सभापती गहिनीननाथ शिरसाट व सीताराम बापू बोरुडे यांनी ढाकणो यांचा सत्कार केला.










