Archive Pages Design$type=blogging

सावेडी बसस्थानकातून बसेस सोडाव्यात; अन्यथा रास्ता रोको

सावेडी बसस्थानकातून बसेस  सोडाव्यात; अन्यथा रास्ता रोको; अहमदनगर- नगर-शिर्डी रस्त्यावरील सावेडी बसस्थानकावरून सर्व जाणार...




सावेडी बसस्थानकातून बसेस 
सोडाव्यात; अन्यथा रास्ता रोको;
अहमदनगर-

नगर-शिर्डी रस्त्यावरील सावेडी बसस्थानकावरून सर्व जाणार्‍या-येणार्‍या एसटी बसेस सावेडी एस. टी. बसस्थानकामध्ये तात्काळ वळविण्यात आल्या तर हायवेवरील वाहतुकीची कोंडी कमी होवून अपघाताचे प्रमाण कमी होईल. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक होवून या बसस्थानकामधून पुणे-मुंबई येथे बस सोडाव्यात. उपनगरातील प्रवाशांना जुन्या बस स्थानकांवरती न जाता जवळच असलेल्या सावेडी येथील बसस्टॅंण्डवरून वेळ, श्रम, पैसे दररोजची गैरसोय कमी होण्यासाठी एस. टी. महामंडळाचे विनाथांबा बसेस सकाळच्या व संध्याकाळच्या वेळेत येथून सोडण्याची मागणी पाईपलाईन, सावेडीगाव, भिस्तबाग, पवननगर, बोल्हेगाव परिसरातील कार्यकर्त्यांच्यावतीने पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात येणार असल्याचे जगदंबा माता ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ वाकळे यांनी सांगितले. 
वाकळे म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून सावेडी बसस्थानक हे उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. हे बसस्थानक गेली अनेक वर्षांपासून इमारत असूनही धुळखात अवस्थेत पडले आहे. उपनगराचा विस्तार वाढत आहे. येथील प्रवाशांना मात्र खिशाला झळ देवून वेळ, श्रम, पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च करून जुन्या बस स्थानकावरती जाण्यासाठी खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा पैसे देवून रिक्षाचालकांची मनधरणी करावी लागते. अनेक वेळेस रात्री लुटमारीचे प्रकार होवू लागले आहे. सावेडीच्या हायवेवरती एस.टी. बस थांबामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अंध, अपंग, वयोवृद्ध, महिला, विद्यार्थी यांना रस्त्यावर बसेसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागते. याबाबत कार्यवाही न झाल्यास येत्या पंधरा दिवसांमध्ये कार्यकर्त्यांच्यावतीने नगर-शिर्डी हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा!

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: सावेडी बसस्थानकातून बसेस सोडाव्यात; अन्यथा रास्ता रोको
सावेडी बसस्थानकातून बसेस सोडाव्यात; अन्यथा रास्ता रोको
http://epunyanagari.com/epaperimages/25072016/25072016-md-ah-17-2818-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_87.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_87.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago