चिमुकल्यांच्या कल्पकतेचा गौरव; अहमदनगर : माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत चिमुकल्य...
चिमुकल्यांच्या कल्पकतेचा गौरव;
अहमदनगर : माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत चिमुकल्यांनी दाखविलेल्या कल्पकतेचा पारितोषिक देवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या वतीने मागील आठवड्यात येथील रेसिडेन्सियल विद्यालयाच्या मैदानावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील चित्रांचे राष्ट्रवादी भवन येथे प्रदर्शन भरविण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, निर्मला मालपाणी, क्रांतिकला अनभुले, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.
पहिली ते चौथी गटात प्रथम- निमिष शिदोरे, व्दितीय-दिशा जामगावकर, तृतीय-जान्हवी धोकटे, उत्तेजनार्थ पार्थ तांबे, आदित्य गवळी, वेदांत अंतरे, अर्णव नागवडे, नीला विधाते.
पाचवी ते सातवी गटात- प्रथम- अनुराग पाटोळे, व्दितीय-वेदांत बोरुडे, तृतीय- सचिन कराळे, उत्तेजनार्थ- कौशल्य नागवडे, कल्याणी बारगळ, विधी सारडा, सानिया कंत्रोड, अथर्व इवळे. आठवी ते नववी गट- प्रथम- तेजस्वी आदमाने, व्दितीय-प्रदीप पवार, तृतीय-सदफ शेख, उत्तेजनार्थ- अभिषेक औटी, गणेश भांगरे, नेहा कावरे, समृध्दी ओहोळ, सोहेब कुरेशी यांना यावेळी पारितोषिक देण्यात आले.
( |










