शालेय वेळापत्रकात ज्युदो, कराटेसाठी एक तास राखीव ठेवण्याची मागणी; अहमदनगर ; नुकतीच कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन अम...
शालेय वेळापत्रकात ज्युदो, कराटेसाठी
अहमदनगर ;
नुकतीच कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन अमानुषपणे हत्या केल्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. या पाशवी घटनेने जिल्ह्यासह राज्याची पुरती नाचक्की झाली आहे. पुन्हा एकदा मुलींचा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलींवर होणार्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. अशा घटना घडल्यानंतर आपण त्या मुलीला योग्य न्याय मिळावा, तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची औपचारिकता करण्यात येते. परंतु या घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात यायला हवेत. असे मनसेच्या वतीने शालेय शिक्षण, क्रीडामंत्री ना.विनोद तावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात त्यांनी बहुतांश बलात्कार - अत्याचारात एक बाब प्रामुख्याने समोर येते ती अशी की, बळाच्या कमतरतेने या घटना घडतात. मुलीला वाढवतानाच तिला नाजूक पद्धतीने वाढवले जाते. अत्याचाराचा प्रतिकार करता यावा यासाठी लहानपणापासूनच तिला शारीरिक आणि मानसिकरित्या कणखरपणे वाढवण्यात यायला हवे. यासाठी शालेय वेळापत्रकात दररोज एक तास हा शारीरिक कसरती, मैदानी खेळ, ज्युदो, कराटे यांसारख्या गोष्टीत तिला प्रोत्साहन देण्यात यावे. स्वसंरक्षणासाठी खंबीरपणे शालेय जीवनातच तिला योग्य ते मार्गदर्शन करुन सक्षम करण्यात यायला हवे जेणेकरुन अशा प्रशिक्षीत मुलींवर अत्याचार करण्यास कोणीही व्यक्त धजावणार नाही. असेही नमूद केले आहे.










