जि.प.सदस्या कालिंदीताई लामखडे यांच्या निधीतून सायकल वाटप; अहमदनगर जिल्हा परिषद सदस्या कालिंदी लामखडे यांच्या निधीतून खारे क...
जि.प.सदस्या कालिंदीताई लामखडे
यांच्या निधीतून सायकल वाटप;
अहमदनगर
![]()
जिल्हा परिषद सदस्या कालिंदी लामखडे यांच्या निधीतून खारे कर्जुने येथील देवराम गंगाधर शेळके विद्यालयात सायकल वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर निमसे हे प्रमुख पाहुणे ,अध्यक्ष म्हणून सरपंच सौ.उषाताई पानसंबळ हे उपस्थित होते.
उपसरपंच कुमार निमसे, भाजप तालुका अध्यक्ष अंबादास पा. शेळके, जबाजी दरेकर, रशीद सय्यद, गणेश पानसंबळ उपस्थित होते. सायकल कागदपत्रांसाठी विशेष करुन अमोल निमसे, अजित तांबे यांनी सहकार्य केले.
अंबादास पा. शेळके यांनी मुलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक मुलाने एकतरी झाड लावायचे व गावात हागणदारी मुक्त करायचे असा संकल्प सर्वांनी करायचा. गावाच्या विकासात सर्व गावकर्यांनी सहकार्य करावे, सर्व मुलांनी खेळाबरोबर अभ्यासाकडे देखील लक्ष द्यायचे. संस्थेचे चेअरमन यांनी सांगितले की, आम्ही शाळेत पायी जात होतो. आता तुमच्या दारात शाळा आली आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी चांगला लाभ घ्यावा.
उपसरपंच कुमार निमसे यांनी शाळेतून एकतरी आयपीएस अधिकारी व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर वराट, खेडकर सर, लहानु बोरुडे, विक्रम नरवडे, विजय निमसे, अजित निमसे व इतर शाळेचे कर्मचारी उपस्थित होते
|










