दारूबंदी करण्यासाठी निघोजमध्ये जय्यत तैयारी निघोजमध्ये बाटली आडवी करण्याचा दारूबंदी समितीचा निर्धार प्रतिनिधी : पारनेर :निघोजमध्ये द...
दारूबंदी करण्यासाठी निघोजमध्ये जय्यत तैयारी
निघोजमध्ये बाटली आडवी करण्याचा दारूबंदी समितीचा निर्धार
प्रतिनिधी : पारनेर :निघोजमध्ये दारूबंदीसाठी लवकरच मतदानाची तारीख जाहीर होणार असून यासाठी दारूबंदी चळवळ समितीने जय्यत तैयारी केली आहे. यावेळी बाटली आडवी करायचीच असा निर्धार दारूबंदी समितीने केल्याने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणींमुळे मतदानानंतर ही दारूबंदी होऊ शकली नाही. याविरोधात दारूबंदी समितीने औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. औरंगाबाद खंडपीठाने त्यांची मागणी मान्य करून पुन्हा पडताळणी करून निवडणुक घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर प्रशासनाने पडताळणीही केली, मात्र ही तारीख लग्नतिथीची असल्याकारणाने महिला त्या दिवशी येऊ शकल्या नाहीत. या दिवशी १ हजाराच्या आसपास पडताळणी पार पडली. त्यानंतर दारूबंदी समितीच्या कार्यकर्त्यानी पुन्हा उत्पादनशुल्कच्या जिल्हा अधीक्षक भाग्यश्री जाधव याना भेटून उर्वरित महिलांची पडताळणी घेण्याची मागणी केली.त्यानुसार नुकतीच उर्वरित २६८ महिलांची पडताळणी पूर्ण झाली असून आता लवकरच दारूबंदीसाठी मतदान घेण्याची तारीख जाहीर होणार आहे. गेल्या वर्षापासून दारूबंदी समितीने हि चळवळ यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अनिल कवडे तसेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आमदार औटी साहेब,तहसीलदार भारती सागरे यांनी दारूबंदी चळवळीला विशेष मदत केली.नुकत्याच झालेल्या ना. विखे यांच्या निघोज दौऱ्यात दारूबंदी समितीने ना.विखे यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.अश्याच प्रकारे उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक भाग्यश्री जाधव, तहसीलदार भारती सागरे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर व सर्वच अधिकाऱ्यांचे आभार मानले.










