कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ खांडगावमध्ये बंद; कोपर्डी तालुका कर्जत येथील अल्पवयीन शालेय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण...
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ खांडगावमध्ये बंद;
कोपर्डी तालुका कर्जत येथील अल्पवयीन शालेय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेचा श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथे कडकडीत बंद पाळून, मूकफेरी काढून तसेच निषेध सभा घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या दरम्यान, गावातील सर्व दुकाने व व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांनी गावातून मूकफेरी काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला
या आंदोलना वेळी झालेल्या निषेध सभेत तुषार ढवळे , अमोल ,टकले, सुखदेव टकले, बाळासाहेब महाडिक, श्रीमती त्रिंबके आदींची निषेधपर भाषणो झाली.
या वेळी चेअरमन काकासाहेब ढवळे, ग्रा.पं.सदस्य विजय ढवळे, उपसरपंच बबन ढवळे, बबन भा. ढवळे ,बबन टकले, विलास ढवळे, ऊत्तम ढवळे, दादाभाऊ टकले, पप्पू तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे,असे सर्वच वक्त्यांनी सांगितले.










