Archive Pages Design$type=blogging

पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ

पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ; अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारया...



पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ;

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे. जिल्हाभरात दुसर्‍या दिवशी राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत एक हजार मतदारांनी अर्ज सादर केले असून, माहिती न देणार्‍या मतदारांचा आकडा 'जैसे थे' आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्यावेळी मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे. निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मतदारयादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ज्या मतदारांचे जुन्या यादीत नाव आहे, त्यांनी छायाचित्रासह २0 मुद्यांची माहिती सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवेळी सूचना देवूनही अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. आतापर्यंत ७९ हजार मतदारांपैकी २५ हजार मतदारांचीच माहिती प्राप्त झाली आहे. उर्वरित ५४ हजार मतदारांनी अद्याप छायाचित्र व इतर माहिती प्रशासनाकडे दिली नाही. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मंडलस्तरावर विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा रविवारी दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी १ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले. दुसर्‍या दिवशीही माहिती देण्यासाठी मतदार घराबाहेर पडले नाहीत. दिवसभरात १ हजार २५ मतदारांनीच छायाचित्र व इतर २0 मुद्यांची माहिती दिली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी दिली. 
जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ही मोहीम राबविण्यात आली आहे. महसूलच्या सुमारे दीड हजार कर्मचार्‍यांनी शासकीय सुटी न घेता मोहीम राबविली. मात्र मतदार माहिती घेऊन आले नाहीत. त्याचबरोबर गावातून रिक्षाही फिरविण्यात आली. परंतु मतदारांमध्ये निरुत्साही वातावरण असल्याचे यावरून स्पष्ट होते. काही ठिकाणी तरी कर्मचार्‍यांनी मतदारांच्या घरी जावून माहिती घेतली असल्याचे याविषयी माहिती देताना उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात प्रभावीपणे ही मोहीम राबविण्यात आली. माहिती न देणार्‍या मतदारांची संख्या मोठी आहे. छायाचित्रासह मतदारयादी अद्ययावत करणे बंनधकारक आहे. परंतु, जिल्ह्यात मतदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. मात्र निवडणुका जवळ आल्यानंतर हेच मतदार तक्रारी करतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. 

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ
पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixIeGXAgb_wggH2gICXX1LgKcn9REPFHs6F_hwCWdf9Hme7QP9Gjtgn79uwz4NRZrDISFV5f0WhPlajzxakfwOORBpmTpwiOH-ex6Lf2kuVKGTi9Czm0J-9UtWWpCOflScQM863AaGaFmi/s200/logo.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixIeGXAgb_wggH2gICXX1LgKcn9REPFHs6F_hwCWdf9Hme7QP9Gjtgn79uwz4NRZrDISFV5f0WhPlajzxakfwOORBpmTpwiOH-ex6Lf2kuVKGTi9Czm0J-9UtWWpCOflScQM863AaGaFmi/s72-c/logo.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_94.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_94.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago