कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ घारगावात मोर्चा; कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचे हाल करून खून करण्यात ...
कोपर्डी येथील घटनेच्या
निषेधार्थ घारगावात मोर्चा;

कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचे हाल करून खून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्त लोकपंचायत, आय.टी.आय व भारत हायस्कूल घारगाव येथील विध्यार्थी-विध्यार्थिनी यांनी घारगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
महिलांवरील अत्याचाराविरुद्ध जनमत जागृती करणो,स्री-पुरुष समताधारी व्यवस्था निर्माण करणो, स्रीकडे बघण्याचा पुरुषाचा आणि समाजाचा दृष्टीकोन बदलणो यासाठी सातत्याने प्रय▪करण्याची गरज लोकपंचायतचे विश्वस्त उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.भारत हायस्कूलचे प्राचार्य सोनावणो यांनी सर्वाना मार्गदर्शन केले. लोकपंचायत आय.टी.आय च्या विध्यार्थिनींनी स्री-मुक्तीसंबंधी 'प्रत्येक मुलीला हक्क आहे,उमलण्याचा फुलण्याचा' हे पथनाट्य सदर केले.सर्व गावातून प्रभात फेरी काढण्यातआली. विध्यार्थिनींनी फलकाच्या माध्यमातून बलात्कार्यांना कडक शासन झालाच पाहिजे 'स्रीचा सन्मान मानवतेचा सन्मान' 'प्रत्येक कळीला हक्क आहे उमलण्याचा फुलण्याचा. 'अशा घोषणा दिल्या. सविता पांडे,स्मिता गाडेकर,दीपश्री चोळके,बाळू हासे,गुलशन चौघुले,शमीम शेख आणि लोकपंचायतच्या बचतगटातील महिलांनीही या मोर्चात सहभाग घेतला. स्रीला निर्भीडपणो समाजात जगता यावे असे वातावरण निर्माण करण्यासाठी पथनाट्याच्या शेवटी सर्वांनी शपथ घेतली. लोकपंचायत आय.टी.आय व भारत हायस्कूल घारगाव यांच्या वतीने निषेध व्यक्त करत घारगाव पोलिस कर्मचारी शिंदे,चंद्रकांत तोर्वेकर,दीपक भांगरे निवेदन देण्यात आले.









