शहरात विनयभंगाच्या दोन घटना अहमदनगर: तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीचे अत्याचार व खुनाचे प्रकरण ताजे असतानाच नगर शहरात क...
|
शहरात विनयभंगाच्या दोन घटना
अहमदनगर: तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीचे अत्याचार व खुनाचे प्रकरण ताजे असतानाच नगर शहरात कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, नगर कॉलेजमधील एका विद्यार्थिनीला तू माझ्याबरोबर लग्न कर, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी सिफान शकील दारुवाला (रा.मुकुंदनगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली
दुसरी घटना तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. नगर-मनमाड रोडवर हडको परिसरात राहणार्या एका १९ वर्षीय तरुणीला मैदानावर जात असताना गौरव आल्हाट याने तिचा पाठलाग करून तिचे नाव विचारून धमकी दिली. तसेच हातवारे करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत तोफखाना पोलिसांनी गौरव आल्हाट याच्याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
|










