शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची उत्साहात सांगता; साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाची माधवराव आजेगाव...
शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची उत्साहात सांगता;
|
साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाची माधवराव आजेगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली. दर्शन रांगेतील भाविकांना मोफत सुमारे २ लाख बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप संस्थानच्या वतीने करण्यात आले. दरम्यान जबलपुर येथील एका दानशुर साईभक्ताने ७३ ग्रॅम वजनाचा सुमारे २ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबांना अर्पण केला.
उत्सव सांगता दिनी संस्थान त्रिसदस्य समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कुटुंबिया समवेत पादयपुजा तर गुरुस्थान मंदिरात कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, सिमा शिंदे या दाम्पत्याच्या हस्ते रुद्राभिषेक पुजा करण्यात आली. देशविदेशातील भाविकांनी उत्सवादरम्यान शिर्डीत हजेरी लावुन साई समाधीचे दर्शन घेतले. उत्सवा दरम्यान मंदिर व परिसरात आकर्षक विदयुत रोषणाई करणारे साईराज डेकोरेटर्स,मुंबई यांचे सदस्य व फुलांची सजावट करणारे बेंगलोर येथील दानशुर साईभक्त के.सी. सुब्रमणी यादव यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.









