शिर्डीसाठी संस्थानच्या निधीतून स्वतंत्र पाईप लाईनचे काम युद्धपातळीवर .साकुरी :साईबाबा संस्थानकडे पाठपुरावा करून मिळविलेल्या ५ कोटी २५ ला...
शिर्डीसाठी संस्थानच्या निधीतून स्वतंत्र पाईप लाईनचे काम युद्धपातळीवर .साकुरी :साईबाबा संस्थानकडे पाठपुरावा करून मिळविलेल्या ५ कोटी २५ लाख रुपये निधीतून कनकुरी पाट ते नवीन साठवण तलावापर्यंत दीड किलोमीटर पर्यंतच्या ३ कोटी २५ लाख रूपये खर्चाची पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. त्यामुळे पूर्वी तलाव भरण्यासाठी १५ दिवस लागत होता, तो तलाव आता अवघ्या ३ दिवसात भरणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी दिली. राहिलेल्या २ कोटी रूपयांतून जुन्या साठवण तलावाचे काम लवकरच पूर्ण होईल विकासाचे काम करताना ते काम लवकर कसे पूर्ण होईल यासाठी आमचा प्रय▪असून या तलावाची पाईपलाईन जुनी असल्यामुळे तलाव भरण्यासाठी १५ दिवस लागत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कमी वेळेत तलाव भरून घेण्यासाठी उपाययोजना करा असे पत्र दिले होते. शिर्डी शहरात पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी प्राधान्य क्रमाने ही कामे आम्ही सुरू केली. १२ फूट खोल अंतरावर ५ मीटर लांबीची व १.२ गोल आकाराची जास्त आयुष्यमानाची पाईप टाकण्यासाठी या कामाचा ठेका कोल्हापूर येथील रविराज इंजिनिअर्सला देण्यात आला आहे. या कामाला सुरुवात होऊन एक महिना झाला असून १५ दिवसात हे काम कसे पूर्ण करून घेता येईल यासाठी आमचा प्रय▪आहे. ते पूर्ण झाल्यानंतर नवीन साठवण तलाव पूर्ण क्षमतेने म्हणजे ५८0 एम एल डी म्हणजे ५८0 कोटी दशलक्ष लिटर क्षमतेचा तलाव पूर्ण भरल्यानंतर शहरातील ३६ हजार लोकांना पूर्ण दाबाने पाणी देण्याचा दिलेला शब्द हे काम पूर्ण झाल्यानंतर पुर्ण करणार आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यशवंत डांगे व सर्व संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत. काम मार्गी लागत असल्यामुळे शिर्डी शहरात समाधानाचे वातावरण पसरले आहे. |










