छत्रपतींवरील धडे पुस्तकात घ्या अहमदनगर : चौथीच्या मराठी आणि इंग्रजीच्या पुस्तकात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चार धडे रद्द...
अहमदनगर : चौथीच्या मराठी आणि इंग्रजीच्या पुस्तकात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चार धडे रद्द केले आहेत. त्या चार धड्यांचा पुन्हा अभ्यासक्रमाच्या पुस्तकात समावेश करावा, अशी मागणी जिल्हा कॉँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी केली आहे.
याबाबत शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. यात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम व संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) यांनी प्रसिद्ध केलेल्या चौथीच्या मराठी आणि इंग्रजीच्या परिसर अभ्यास भाग २ या पाठय़पुस्तकातील शिवाजी महाराज यांच्यावरील चार धडे वगळले आहेत. याबाबत शिक्षक, इतिहास मंडळ किंवा तज्ज्ञ यांच्यापैकी कोणालाही कळविण्यात आलेले नाही. शिवचरित्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या इतिहासाबरोबरच त्यांचे युद्धचातुर्य व रयतेचा न्याय हेही तितकेच महत्त्वाचे पैलू आहेत. यामधून विद्यार्थ्यांवर निश्चितच चांगले संस्कार होत आहेत. शासनाने याबाबत दखल घेवून वगळलेल्या चार धड्यांचा पुन्हा समावेश करावा.










