बेरोजगारांसाठी मुद्रा योजना फलदायी : रोहिदास कर्डिले; केंद्र शासनाने सुरू केलेल्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांन...
बेरोजगारांसाठी मुद्रा योजना फलदायी : रोहिदास कर्डिले;
![]()
केंद्र शासनाने सुरू केलेल्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना कर्ज मिळेल व त्यांना रोजगार मिळू शकतो, असे प्रतिपादन बाणेश्वर दूध संघाचे अध्यक्ष आणि युवानेते रोहिदास कर्डिले यांनी केले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील मुलांनी उच्चशिक्षण घेतले, मात्र त्यांना तात्काळ नोकर्या मिळत नाहीत. यावेळी बेरोजगार तरुणांनी केंद्र शासनाने सुरु केलेल्या मुद्रा योजनेचा लाभ घेवून, राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा सहकारी बँकेकडे कर्जाचे प्रकरणे दाखल करुन कर्ज मंजूर करुन स्वत:चा रोजगार व्यवसाय उभा करावा. त्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वत:ची पत वाढवून बॅंकेमध्ये क्रेडिट निर्माण करावे. बॅंकेकडून पन्नास हजार पासून दहा लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. यापुढील काळात ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसायासह आधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेती करण्याची गरज आहे. बेरोजागार तरुणांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी रेाजगार मेळावा घेणार असून, त्या दृष्टीकोणातून तरुणांना विविध व्यवसाय, व्यापाराचे मार्गदर्शन केले जाणार आहे. पाथर्डी-नगर तालुक्यामधून या शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले
|










