राज्य सरकारची तातडीची सेवा(EMS NO108) करत आहे गरजु व्यक्तींना मदत प्रतिनिधी : पारनेर :राज्य सरकारची तातडीची सेवा(EMS NO108) करत आहे गर...
राज्य सरकारची तातडीची सेवा(EMS NO108) करत आहे गरजु व्यक्तींना मदत
प्रतिनिधी : पारनेर :राज्य सरकारची तातडीची सेवा(EMS NO108) करत आहे गरजु व्यक्तींना मदत
आज पारनेर बसस्थानकावरील बेवारस वृध्द महिलेला चांगलाच उपयोग झाला.
आज (दि.११) सकाळी ही महिला चक्कर येउन पडल्याची माहिती EMS चे डॉ. नरेंद्र मुळे यांना कळवल्यावर ते ताबड़तोड़ बसस्थानकावर आले. दरम्यान त्यांनी बोलावलेली रुग्णवाहिका बसस्थानकावर आली. रुग्णवाहिकेसोबत असणा-या डॉ. पुजारी व सहका-यांनी या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. झिने यांनी दिवसभर उपचार केले. मात्र उपचाराला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॉ. झिने यांनी या महिलेला नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधे पुढील उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पुन्हा EMS च्या रुग्णवाहिकेतून या महिलेला नगरला हलवण्यात आले. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सोनवणे यांनीही चांगले सहकार्य केले.
अनेकदा आपल्याला सरकारी कारभाराचा वाईट अनुभव येतो. मात्र आज याच सरकारच्या सेवेचा कधीतरी येणारा असा सुखावणारा अनुभव सरकारी सेवेची अत्यावश्यक गरज अधोरेखित करून जातो.
अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असणा-या या महिलेवर कोणतेही आढेवेढे न घेता योग्य उपचार करणा-या डॉक्टरांमधील सेवावृत्तीला सलाम !










