Archive Pages Design$type=blogging

महापुराने जिल्ह्यात ५00 कुटुंबांची दाणादाण शिवाजी जाधव एकाचा मृत्यू पाच जण जखमी

महापुराने जिल्ह्यात ५00 कुटुंबांची दाणादाण शिवाजी जाधव एकाचा मृत्यू पाच जण जखमी; पावसामुळे अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील ...


महापुराने जिल्ह्यात ५00 कुटुंबांची दाणादाण
शिवाजी जाधव एकाचा मृत्यू
पाच जण जखमी;
पावसामुळे अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील राजाराम महादू गायकर ओढण्याच्या पाण्यात वाहून गेले. पुरात त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय संगमनेर तालुक्यातील वडझरी येथील वर्षा नंदू कळसकर भिंत अंगावर पडून जखमी झाले आहेत. अकोले तालुक्यातील मौजे म्हाळादेवी येथे कैलास भास्कर मुंढे व कविता कैलास मुंढे हे जखमी झाले आहेत. कोंभाळणे येथील बबन चंदर पथवे हे सिन्नर येथील पुलावरून वाहून गेले असून, त्यांचा अद्याचा शोध लागलेला नाही. डाऊचच्या बेटावर अडकलेल्या २२ जणांना तब्बल ३८ तासांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने गुरूवारी सकाळी सुखरूपपणे बाहेर काढले. ७५ घरांची पडझड
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संगमनेर तालुक्यातील ४५ तर अकोले तालुक्यातील ३0 घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले असून, सरकारकडून अर्थिक मदत देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पाण्याचा वेग मंदावला
नांदुरमध्यमेश्‍वर बंधार्‍यातून बुधवारी पहाटे २ लाख ४१ हजार क्युसेक वेगाने सुरू होता. हा विसर्ग गुरुवारी सायंकाळी ६0 हजार झाला. विसर्गात घट झाल्यामुळे नगर जिल्ह्यातील पूर ओसरला असून, नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला. अहमदनगर: गोदावरीच्या रुद्र अवताराने उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील २0 गावांना मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ५00 कुटुंबांची दाणादाण उडाली असून, दोन हजार ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत. 
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पावसाने उच्चांक गाठला. गोदावरीच्या महापुराचा पहिला तडाखा कोपरगाव शहराला बसला. कोपरगाव शहरातील ७१ घरांत पाणी घुसले. राहाता तालुक्यातील पुणतांबा, शिंगवे आणि रस्तापूर येथील ६४ घरांना पाण्याने वेढले होते. त्यामुळे १0४ कुटुंबाची दाणादाण उडाली. राहात्यातील ५६३ ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, मातुलठाण, नाऊर, रामपूर, कमालपूर, भामाठाण, खानापूर, महांकाळ वाडगाव, गोवर्धनपूर, अशा दहा गावांतील ६८ कुटुंबातील २८२ ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत. नेवासा तालुक्यातील जैनपूर, उस्थळ खासला, घोगरगाव आणि रस्तापूर येथील १२0 कुटुंब विस्थापित झाली आहेत. या गावांतील ४९९ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. 
प्रशासकीय यंत्रणेने पूर येण्याआधीच बुधवारी पहाटे नदीकाठच्या १ हजार ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले होते. कोपरगाव तालुक्यातील के . बी. के. विद्यालय, एस. जी. विद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. राहाता तालुक्यातील पूरग्रस्तांना शिंगवी येथील वाणी हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळा व नातेवाईकांकडे पाठविण्यात आले. नेवासा तालुक्यातील कमालपूर आश्रमात अडकलेल्या २४ भक्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक येथील शेतकर्‍यांना पुराची कल्पना देण्यात आली होती. नागरिकांना बाहेर येण्याची विनंतीही स्थानिक प्रशासनाने केली होती. परंतु त्यांनी बाहेर येण्यास सपशेल नकार दिला. त्यामुळे एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: महापुराने जिल्ह्यात ५00 कुटुंबांची दाणादाण शिवाजी जाधव एकाचा मृत्यू पाच जण जखमी
महापुराने जिल्ह्यात ५00 कुटुंबांची दाणादाण शिवाजी जाधव एकाचा मृत्यू पाच जण जखमी
http://epaper.lokmat.com/EpaperImages//ngr//582016//d17112-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/00.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/00.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago