१५ ऑगस्टपर्यंत दोषारोपपत्र दाखल करा कोपर्डीची घटना अस्वस्थ करणारी : कोपर्डीची घटना मनाला अस्वस्थ करणारी असून, अशा प्रकारात गुन्ह...
१५ ऑगस्टपर्यंत दोषारोपपत्र दाखल करा
कोपर्डीची घटना अस्वस्थ करणारी :
![]()
कोपर्डीची घटना मनाला अस्वस्थ करणारी असून, अशा प्रकारात गुन्हेगारांची डीएनए चाचणी होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत शिवसेनेच्या नेत्या आ. नीलमताई गोरे यांनी कोपर्डी भेटीत व्यक्त केले. आज़ दि. ३१ रोजी आ. नीलमताई गोरे यांनी कोपर्डी येथील पीड़ित मुलीच्या कुटुंबयांची भेट घेऊन सांत्वन केले,या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी कुटुंबीयांशी सवांद साधताना, सदरची घटना मनाला अस्वस्थ करणारी असून, अशा घटनेतील आरोपींना कड़क शासन होणो गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार व छेड़छाडीच्या प्रकारांत वाढ होत असून, पोलिसांनी अशा प्रकारात किरकोळ घटनेचीही तातडीने दखल घेणो गरजेचे आहे. कोठेवाडी, बीड जिल्ह्यातील काठवाडा आदी घटनेत शिक्षा झाली असून, या घटनेत सुद्धा या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी प्रय▪केले जातील. कोपर्डी प्रकरणात दि. १५ ऑगस्टपर्यंत दोषारोपपत्र दाखल करून पीड़ित मुलीला योग्य तो न्याय मिळावा. अशा घटना जातीपातीचा विचार न करता गुन्हेगारी प्रवृत्तीचा सवार्ंनी एकत्र येवून याचा सामना करावा. पोलिसांना ग्रामसुरक्षा दल स्थापण्याबाबत सूचना गोरे यांनी केल्या. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गा.डे, नगरच्या महापौर सुरेखा कदम, सुनीता बोझ्झा, ऊषा ठानगे, उषा नलावडे, मनीषा सोनमाळी ,शहाजी राळेभात,गणोश क्षीरसागर,अनिल यादव आदी उपस्थित होते.
|










