औरंगाबादच्या अंकितला पुरस्कार; श्रीकांत मुंडे शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने आनंद : अंकित बावणे बीसीसीआयचे सचिव अजय शि...
औरंगाबादच्या अंकितला पुरस्कार;

श्रीकांत मुंडे शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने आनंद : अंकित बावणे
बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांच्या हस्ते गत रणजी हंगामात सर्वाधिक काढल्याबद्दल पुरस्कार मिळाला ही माझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना आहे. त्याचप्रमाणे सीनिअर गटात सर्वोत्तम फलंदाज ठरणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद व आनंदाची बाब आहे. एमसीए सर्वोत्तम खेळाडूचा गौरव करते ही आमच्यासाठी महत्त्वाची आणि प्रेरणादायक गोष्ट आहे. आपले लक्ष्य हे महाराष्ट्राला रणजी ट्रॉफीत जिंकून देणे हे आहे, अशी प्रतिक्रिया मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे याने 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज औरंगाबादचा अंकित बावणे, परभणीचा श्रीकांत मुंडे, नांदेडचा शमशुझमा काझी यांचा त्यांनी २0१५-१६ दिलेल्या जबरदस्त योगदानामुळे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे पुणे येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
६0 प्रथम श्रेणी सामन्यात १३ शतके आणि २२ अर्धशतकांसह ५२.३१ च्या सरासरीने ३ हजार ९७६ धावा फटकावणारा अंकित बावणे याने २0१५-१६ या हंगामात महाराष्ट्राकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक ४५.९0 च्या सरासरीने आठ सामन्यांत ५0५ धावा केल्या होत्या. त्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांच्या हस्ते त्याचा सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार देऊन गौरव केला. याप्रसंगी उपाध्यक्ष कमलेश ठक्कर, सचिव सुधाकर शानबाग, विभागीय सचिव प्रदीप देशमुख, विनोद शाह, विकास काकतकर आदी उपस्थित होते. अंकितप्रमाणेच मराठवाड्याचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडे याचा रणजी ट्रॉफीत महाराष्ट्रातर्फे सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. श्रीकांत मुंडे याने गत रणजी हंगामातील ८ सामन्यात एकूण ३0 बळी घेतले.नांदेडचा अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझी यालादेखील रणजी वनडेतील स्पर्धेत महाराष्ट्राकडून गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. फलंदाजीत केदार जाधव याचा गौरव करण्यात आला. सत्यजित बच्छाव, ऋतुराज गायकवाड, ओम भोसले, ओंमकार मोहिते यांच्यासह महिला गटात स्मृती मानधना, अनुजा पाटील, माया सोनवणे आणि इझान सय्यद यांनाही स्मृतिचिन्ह देण्यात आले









