राजस्थानी बहु मंडळाचा उपक्रम गो-खाद्य तुलादान मोहिमेचा प्रारंभ अहमदनगर ; गो रक्षणाच्या भावनेने राजस्थानी बहु मंडळाच्यावतीने सुरु ...
राजस्थानी बहु मंडळाचा उपक्रम गो-खाद्य तुलादान मोहिमेचा प्रारंभ
अहमदनगर ;
गो रक्षणाच्या भावनेने राजस्थानी बहु मंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या गो खाद्य तुलादान मोहिमेचा शुभारंभ महापौर सौ. सुरेखा कदम यांच्या हस्ते झाला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.निर्मलाताई मालपाणी, नगरसेविका मंगल गुंदेचा, मंडळाच्या अध्यक्षा राजकन्या सारडा, सचिव अर्चना लड्डा, सुनिता मन्यार, ललिता झंवर, कविता मंत्री, वंदना काकाणी, विमल बिहाणी, सिमा बंग, आशा सोनी, सुनिता झंवर, सुचिता झंवर, ज्योती इंदाणी, स्वाती काबरा, दीपाली काबरा आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या मोहिमेत मंडळाच्या महिलांना तराजूत गो खाद्याने तोलण्यात आले. महिलांच्या वजनाऐवढे तोलण्यात आलेले गो खाद्य जिल्ह्यातील गो शाळेस देण्यात येणार आहे. गो खाद्यात सरकी पेंड, बाजरी, कडबा, हिरवा घास, गहूच्या भरड्याचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीनिवास सारडा व राजकन्या सारडा यांनी या उपक्रमाची संकल्प पूजा करुन गो पूजन केले. सौ. मालपाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, महिलांनी पुढाकार घेऊन गो शाळेस चारा व खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला उपक्रम प्रशंसनीय आहे. महिलाशक्ती एकत्र आल्यास चांगले विधायक कामे मार्गी लागू शकते हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गो शाळेच्या माध्यमातून गो रक्षण केले जात आहे. मात्र त्यांच्या खाद्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत आहे. महिलांनी पुढे येऊन गो मातांसाठी चारा व खाद्य उपलब्ध करुन देण्याची सुरु केलेली मोहिम राज्याला दिशा देणारी असल्याचे सांगितले.










