मराठा एकीकरण समितीचा शुक्रवारी मोर्चा राहुरी तालुक्यातील अवैध व्यवसाय, महिला अत्याचाराचे प्रकार, वाळू तस्करांची दहशत मोडीत काढण्य...
मराठा एकीकरण समितीचा शुक्रवारी मोर्चा
![]()
राहुरी तालुक्यातील अवैध व्यवसाय, महिला अत्याचाराचे प्रकार, वाळू तस्करांची दहशत मोडीत काढण्यासाठी शुक्रवार, दि. १९ रोजी सकाळी ११ वा. तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये सर्व मराठा समाज, बारा बलुतेदार समाज, महिला, युवती, युवक आदींनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजीव भोर, राजू शेटे, देवेंद्र लांबे आदींनी केले असून यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा करण्यात येईल, असेही म्हटले आहे.राहुरी-तांदुळवाडी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूरसह बहुतांशी गावात महिलांच्या छेडछाडीचे व अत्याचाराचे प्रकार वाढले असून धामोरी येथील तरुणाच्या अपहरण प्रकरणी आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी महसूल व पोलीस प्रशसनाविरोधात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय राहुरी येथील मराठा एकीकरण समिती व राजूभाऊ शेटे मित्रमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदनही तहसील कार्यालयाला देण्यात आले.
धामोरी येथील युवक संभाजी उगले अपहरण प्रकरणी तसेच राहुरी तालुक्यातील महिला, मुलींचे छेडछाड, अवैध व्यवसाय वाढल्याने महसूल व पोलीस प्रशासनावर भव्य मोर्चा काढण्यासंदर्भात राजू शेटे मित्रमंडळ, मराठा एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर म्हणाले, राहुरी तालुक्यात अवैध व्यवसाय वाढले आहेत. महिला व मुली सुरक्षित राहिल्या नाहीत. यावेळी राजू शेटे, देवेंद्र तांबे, सिंधुताई पवार, राहुल शेटे, मनोज हासे, दत्ता काकडे, शाम गोसावी, भरत धोत्रे, शीला देशमुख, बाळासाहेब पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीनंतर सर्व उपस्थित कार्यकर्ते व महिलांनी शांततेच्या मार्गाने तहसील
कार्यालयात जावून नायब तहसीलदार सुभाष कदम, रुपाली गुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, बालाजी शेंगेपल्लू यांना शुक्रवार, दि. १९ रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन दिले. यावेळी सुमारे एक हजार युवक कार्यकर्ते व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते
|










