वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमुळे व्यक्तिमत्व खुलते : डॉ. साताळकर अहमदनगर - जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगले वक्तृत्व असण...
वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमुळे
व्यक्तिमत्व खुलते : डॉ. साताळकर
अहमदनगर -
![]()
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगले वक्तृत्व असणो आवश्यक आहे. चांगले वक्तृत्व असलेल्या व्यक्ती कधीही जीवनामध्ये अपयशी होत नाहीत. त्यामुळे शालेय जीवनापासूनच वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलते, असे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रवींद्र साताळकर यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे उद.घाटन डॉ. साताळकर यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष वसंत लोढा, उपाध्यक्ष गौतम दीक्षित, सचिव विकास पाथरकर, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे शहर संघचालक वाल्मिक कुलकर्णी, उपनिबंधक अनिल दाबशेडे, स्पर्धाप्रमुख प्राचार्य सुनील पंडित, र्मचंट बँकेचे संचालक अमित मुथा, सुरेश रुणवाळ, अंकुश गोळे, शिक्षणाधिकारी त्रिंबक गायकवाड, कमलेश वैकर आदी उपस्थित होते.
प्रा. बेरड, लोढा, उपनिबंधक दाबशेडे, शिक्षणाधिकारी गायकवाड, वाल्मिक कुलकर्णी यांची यावेळी भाषणे झाली. गौतम दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सुनील पंडित यांनी स्वागत केले. अनिल मोहिते, राजेंद्र गटणो, अंकुश गोळे, राजाभाऊ काळे, बाळासाहेब भुजबळ, प्रशांत मोहोळे, श्रीकांत आपटे, श्रीराम देशमुख, कैलास दळवी, एम. डी. कुलकर्णी यांनी प्रय▪केले. शारदा होशिंग व हर्षदा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.
|










