आमदार संग्राम जगताप : प्रभाग बारामधील विकासकामांचा प्रारंभ विरोधाला विरोध नाही, चुकीचे काम होऊ देणार नाही; अहमदनगर ; विरोधाला वि...
आमदार संग्राम जगताप : प्रभाग बारामधील विकासकामांचा प्रारंभ
विरोधाला विरोध नाही, चुकीचे काम होऊ देणार नाही;
अहमदनगर ;

विरोधाला विरोध ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची कधीच निती राहिलेली नाही. चुकीचे असेल, त्याला विरोध होणारच. त्यात दुरुस्ती होईपर्यंत विरोध होणार. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदच पाहिजे असे नाही. नेत्यापेक्षा कार्यकर्ता मोठा आहे. महापालिकेत विरोधी बाकावर बसून नुसते बघ्याची भूमिका घेणार नाही. चांगल्या कामासाठी आमचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग बारामध्ये सुमारे सव्वा कोटींच्या विकास कामांचा प्रारंभ झाला. त्यावेळी जगताप बोलत होते. माजी आमदार दादा कळमकर अध्यक्षस्थानी होते. माजी सभागृहनेता कुमार वाकळे, राष्ट्रवादीचे गटनेता संपत बारस्कर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, अजिंक्य बोरकर, जितू गंभीर, निखिल वारे, अभिजीत खोसे, डॉ. संदीप काळोखे, दीपक जाधव, विवेक गायकवाड, भाऊसाहेब पंडित, अँड़ प्रसाद डोकेआदी उपस्थित होते.
झोपडी कॅन्टीन ते तोफखाना पोलिस स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण, डॉ. निसार हॉस्पिटल ते मिस्किन मळा रस्त्याचे डांबरीकरण, सिव्हील हडको ते राऊत लॉन्ड्री रस्त्याचे कॉँक्रीटीकरण, समता चौक ते परभणे घर रस्त्याचे डांबरीकर, निसार हॉस्पिटल ते शिवाजी चौक सिव्हिल हडको रस्त्याचे डांबरीकरण, गणेश चौक ते जैन स्थानक ते पोस्ट कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण, तसेच भारत चौक ते समता चौक जोडणार्या पुलाचे भूमिपूजन यावेळी श्रीफळ वाढवून झाले.
अभिषेक कळमकर यांनी प्रास्ताविक केले. शहराच्या विकासाकरीता व शहरातील रस्ते खडड्डेमुक्त होण्याकरीता मंजूर झालेले १४५ रस्त्यांची कामे होणे आवश्यक होते. यासाठीच शासनाकडे वारंवार पाठपुरवठा करुन ४0 कोटींचा निधी मिळविला. शहरातील या महत्वपूर्ण रस्त्याची कामे टप्प्याटप्याने मार्गी लागतीलच, त्याबरोबर प्रभाग १२ मधील वसाहतीही विकसित करण्याचे नियोजन केले आहे. पुढील २५ वर्षाचा विचार करुन प्रभाग बारामधील सर्व भागांमध्ये विकासकामे होतील. भविष्यात हा प्रभाग समस्यामुक्त करणार असून तो मॉडेल प्रभाग होईल.
प्रदीप नाईक, साबीर अली, प्रभाकर भापकर, गणेश गांधी, विश्वास वाघमारे, मच्छिंद्र भगत, नितीन खंडागळे, मॅन्युअल साळवे, हानी लोखंडे, रेणुल गवळी, गणेश शेकटकर, सुरेश शिंदे, विजय गुगळे, प्रशांत दारकुंड, गौतम मुथा, महेश जगताप, वैभव शहाणे, गणेश चौरे, तुमन पेल्ली, कुमार लोखंडे, सुमित अडागळे, बाळासाहेब जगताप, वैभव पंडित, राजेंद्र कलानुरे, रमेश चिलका आदी उपस्थित होते.









