रणगाडा संग्रहालयातील शस्त्रास्त्रांची उत्सुकता अहमदनगर स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरकरांनी शहरातील ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी जशी गर...
रणगाडा संग्रहालयातील शस्त्रास्त्रांची उत्सुकता

अहमदनगर स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरकरांनी शहरातील ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी जशी गर्दी केली होती, तशी सोलापूर रस्त्यावरील रणगाडा संग्रहालय पाहण्यासाठी गर्दी केली होती. रणगाडा संग्रहालयातील शस्त्रास्त्र पाहून विशेष करून लहान मुलं हरखून गेली होती. बंदुका, तोफा, रणगाडा, दुर्बिण असे साहित्य हाताळताना मुलांचा आनंद गगनात मावेनासा होत होता. दरवर्षी १५ ऑगस्टला रणगाडा संग्रहालयामध्ये गर्दी करतता. नगरच्या संग्रहालयात ६0 रणगाडे, हलकी लढाऊ वाहने, बंदुक, चिलखती वाहने, दुर्बिणीसारखी साहित्य ठेवण्यात आली आहेत. हा परिसर आर्मड कोअर सेंटर तथा स्कूल (एसीसीएस) ताब्यात आहे. या परिसरात एसीसीएसच्या जवानांनी हिरवाई फुलवली आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर तालुक्यातील देशप्रेमींनी देखील गर्दी केली होती. महाविद्यालय युवक-युवतींची विशेष करून गर्दी होती. शाळेतील मुलांनी याबाबतचे प्रश्न विचारून तेथील अधिकार्यांना हौराण करून सोडले होते. तरुण-तरुणींनी देखील गर्दी केली होती. मुलांनी आपल्या आईवडिलांसमवेत संग्रहालयात येणे पसंत केले. काही युवकांनी लष्कारात भरती होण्याची प्रक्रिया अधिकार्यांकडून समजावून घेतली.









