मेंदू, मणके विकार व हृदयरोग तपासणी शिबिरास प्रतिसाद ; अहमदनगर ; सीटीकेअर हॉस्पिटल व लायन्स क्लब अ.नगर मिलेनियम यांच्या संयुक्त...
मेंदू, मणके विकार व हृदयरोग तपासणी शिबिरास प्रतिसाद ;
अहमदनगर ;

सीटीकेअर हॉस्पिटल व लायन्स क्लब अ.नगर मिलेनियम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेंदू, मणकेविकार व हृदयरोग मोफत तपासणी शिबिराचे उदघाटन चँरीटी इनस्पेक्टर ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी न्यूरोसर्जन डॉ.गुरनीत सिंग, डॉ. संदीप सुराणा, झोनल चेअरमन डॉ. संजय आसनानी ,ला. अध्यक्ष शर्मिला पाटील, सचिव डॉ.हेमा सुराणा, खजिनदार ला.मीना हलवानी, र्मचंट बँक संचालक अजय मुथा, डॉ. चंद्रकांत कदम, डॉ.संजय वरुडे व ला.सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. गुरनीत म्हणाले कि गेल्या तीन महिन्यात रुग्णांनी आमच्यावर विश्वास ठेवल्यामुळे कठीण अशा मेंदू व मणके विकाराच्या ७0 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. रुग्णांना अत्यंत चांगली सुविधा आता नगरमध्ये मिळते हे लोकांना लक्षात आले असून प्रतिसाद वाढत आहे.शर्मिला पाटील म्हणाल्या कि, वैद्यकीय सेवा सुविधा अत्यंत खर्चिक असली तरी ती सर्वसामान्यांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात लायन्स क्लब ऑफ मिलेनियमला सिटीकेअर हॉस्पिटलच्या सहकार्याने शक्य झाले. त्यामुळे हजारो रुग्णांना याचा लाभ झाल्याचे समाधान मिळाले आहे. प्रास्ताविक व स्वागत डॉ.संदीप सुराणा यांनी केले. रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचे समाधान व उत्तम सेवा कमी खर्चात सिटीकेअरने सतत उपलब्ध करून दिली असून शासकीय योजनांमध्ये बसणार्या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. सर्व प्रकारांच्या आजारांवर सर्व अत्याधुनिक सुविधांबरोबरच पूर्ण वेळ तज्ञ डॉक्टर सतत उपलब्ध आहेत. याप्रसंगी डॉ.संजय आसनानी, डॉ.चंद्रकांत कदम, सी.ए.अजय मुथा यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हेमा सुराणा यांनी केले व आभारही मानले. या शिबिरात मोफत तपासणी नंतर गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास ला. राजेश कटारिया, ला.महेश पाटील, ला.निलेश संकलेचा, ला.संजय आडेप, ला. हरीश अडवानी उपस्थित होते









