सभापतीपदी सचिन जाधव बिनविरोध असे झाले सभापती ..; एकमेव अर्ज दाखल : आज अधिकृत घोषणा अहमदनगर : महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपद...
सभापतीपदी सचिन जाधव बिनविरोध
एकमेव अर्ज दाखल : आज अधिकृत घोषणा
अहमदनगर : महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक सचिन जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारी सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्थायी समितीचा सभापती बिनविरोध निवडला जाणे ही महापालिकेत ऐतिहासिक घटना मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तुळात उत्साहाला उधाण आले आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.५) जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी सचिन जाधव यांनी तीन अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
दुपारी दोनपर्यंत जाधव यांच्याशिवाय कोणाचाही अर्ज दाखल झाला नसल्याने सभापतीपदावर सचिन जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शुक्रवारी सकाळी निवडणूक प्रक्रिया होईल. अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षेतखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानंतर जाधव यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल.
अँड. अभय आगरकर, मनेष साठे, नरेंद्र कुलकर्णी, सुभाष लोंढे, अविनाश घुले, संजय गाडे, अनिता राठोड, बाबासाहेब वाकळे, किशोर डागवाले, गणेश भोसले हे आतापर्यंत झालेले स्थायी समितीचे सभापती आहेत. आतापर्यंत दहा सभापती निवडले गेले असून त्यांच्यासाठी निवडणूक झालेली आहे. शुक्रवारी होणारी निवड बिनविरोध होणार आहे. असे झाले सभापती.. स्थायी समितीच्या नियुक्त्या बेकायदेशीर झालेल्या आहेत. याबाबत खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. नियमबाह्य नियुक्त्यांमुळे या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाग घेतला नाही. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करण्यात येईल.
-अभिषेक कळमकर, माजी महापौर स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होत आहे. ही घटना महापालिकेत ऐतिहासिक ठरणार आहे. महापौरपदासोबत सभापतीपदाचीही निवडणूक बिनविरोध होत आहे, याचा शिवसेनेला मनस्वी आनंद झाला आहे. विरोधकांना उमेद्वार मिळाला नाही. उमेदवार मिळाला असता तरी सूचक-अनुमोदक मिळाले नसते. राजकीयदृष्ट्या आमचा मोठा विजय झाला आहे










