मदतीसाठी पूरग्रस्तांचे नेवाशात उपोषण; नेवासा : लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आश्वासन न पाळल्यामुळे गोदावरीकाठी असलेल्या पूरग्रस्तांना ...
मदतीसाठी पूरग्रस्तांचे नेवाशात उपोषण;

नेवासा : लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आश्वासन न पाळल्यामुळे गोदावरीकाठी असलेल्या पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, या प्रमुख मागणीसाठी नेवासा तालुक्यातील जैनपूर व पंचक्रोशीतील पूरग्रस्तांनी शुक्रवारपासून नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. उपोषणात महिला, पुरुषांसह सुमारे १५४ पूरग्रस्त सहभागी झाले आहेत.
या उपोषणाचे नेतृत्व अलका डीके, संदीप डीके, पोपट पंडूरे, पांडुरंग डीके, रामा डीके, मीरा बैरागी, रामा नागरे, ताराचंद पंडूरे, सारंगधर सोनवणे, कडूबाळ डीके, पार्वती डहारे, ललिता पंडूरे, गोरख डहारे, लता बैरागी यांनी केले. माजी सरपंच सतीश गायके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, बेलपिंपळगावचे कामगार तलाठी झुंबरराव आव्हाड यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली, मात्र जोपर्यंत तातडीची मदत मिळत नाही तोपयर्ंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.
सन २00६ मध्ये आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाने त्वरित पावले उचलून पूरग्रस्तांना तातडीची पाच हजार रुपयांची मदत केली होती. याची उपोषणकर्त्यांनी अधिकार्यांना आठवण करुन दिली. उपोषणात सहभागी महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले.
(तालुका प्रतिनिधी) नेवासा येथील गोदावरी नदीकाठावरील पूरग्रस्तांनी मदतीसाठी नेवासा तहसीलसमोर उपोषण सुरु केले आहे









