मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणले : आ. कर्डिल ; मतदारसंघात विकासकामे करताना मागासवर्गीय समाजासाठी सभामंडप, हायमॅक्स, कॉंक्रिट र...
मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणले : आ. कर्डिल ;
मतदारसंघात विकासकामे करताना मागासवर्गीय समाजासाठी सभामंडप, हायमॅक्स, कॉंक्रिट रस्ते,
बोरवेलसाठी निधी देवून त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपण केले आहे, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे सभामंडपाचे उद््घाटन व नळ पाणी योजनेचे उद््घाटन आ. कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मिरी - तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर होते. या वेळी सरपंच विमल आव्हाड, उपसरपंच दादासाहेब नजन, जगदिश सोलाट, संतोष शिंदे, एकनाथ झाडे, अण्णासाहेब शिंदे, अन्सार शेख, सुरेश चव्हाण, रावसाहेब वांढेकर, प्रमोद गाडेकर, बाबाजी पालवे, साहेबराव गवळी, रामकिसन वांढेकर, सुखदेव जाधव, कैलास गीते, संतोष पालवे, काकासाहेब पालवे, नवनाथ पाठक, रामदास गोरे, छबूराव मुळे, प्रा. दारकुंडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. शिराळ येथे विकास कामांच्या निमित्ताने बोलताना आ. कर्डिले म्हणाले, सभामंडप, रस्ते, बंधारे यांच्यासाठी शासन मोठा निधी देते. मात्र, ती कामे चांगल्या पध्दतीने करून घेण्याची जबाबदारी त्या गावच्या ग्रामस्थांवर असते. एखादे काम निकृष्ट होत असेल्यास माझ्याशी संपर्क साधा, मी अधिकारी आणि ठेकेदारांना पाठीशी घालणारा माणूस नाही. सभामंडपामुळे गावच्या वैभवात भर पडत असली तरी त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. मिरी-तिसगाव पादेशिक नळ योजनेच्या अध्यक्षपदावर एकनाथ आटकर यांची नियुक्ती केली आणि त्यांनीसुद्धा रात्रं-दिवस परिश्रम घेवून दुष्काळी परिस्थितीमध्ये २८ गावांना सुरळीत पाणी दिले. या सर्व नियोजनाचे श्रेय आटकर व त्यांच्या टिमला देत असल्याचे आ. कर्डिले म्हणाले. मी. एक करारे नेता असून, नुसतं डिगी घेवून घरी बसून जनतेचे पश्न सुटत नसतात. कामाचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो म्हणूनच पाचेवेळा आमदार झालो, असे आ. कर्डिले म्हणाले. प्रास्ताविक युवानेते वैभव खलाटे यांनी केले. आभार शरद मुळे यांनी मानले










