नपाच्या आरोग्य अधिकार्यान्ांा घेराव मुकुंदनगर विकास कमिटीचा ; अहमदनगर मुकुंदनगर उपनगरात गेल्या एक महिन्यापासून डेंग्यू, ...
नपाच्या आरोग्य अधिकार्यान्ांा घेराव
मुकुंदनगर विकास कमिटीचा ;
अहमदनगर
![]()
मुकुंदनगर उपनगरात गेल्या एक महिन्यापासून डेंग्यू, हिवताप व इतर संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असताना, अनेक नागरिक आजारी पडले आहे. महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ मुकुंदनगर विकास कमिटीच्यावतीने मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना घेराव घालून, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. डेंग्युने एखादा रुग्ण दगावल्यास महापालिका अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा कमिटीच्यावतीने देण्यात आला.
यावेळी वास्तुविशारद अर्शद शेख, मौलाना हाफीज जमीर, हनिफ शेख, अन्सार सय्यद, गुफरान शेख, इस्माईल शेख, सलिम सय्यद, जावेद शेख आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुकुंदनगर परिसरात असंकलित कचर्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेस नागरी सुविधा व स्वच्छतेचे प्रश्न निदर्शनास आणून देखील त्याचा गांभीर्याने विचार केला जात नाही. महापालिकेच्यावतीने मुलभूत सेवा-सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने मुकुंदनगरमध्ये साथीचे रोग पसरले आहे. या परिसरात २00 पेक्षा जास्त डेंग्युचे रुग्ण आढळले असून, अनेक डेंग्यू संशयीत रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६३ च्या पोटकलम २,३,४,६ व १६ नुसार नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची असताना, मुकुंदनगर येथील आरोग्य समस्यांवर हरित लवादाने महापालिका प्रशासनाला नोटीस बजावली आहे. यामध्ये महापालिका प्रशासनाचे संबंधीत अधिकारी व कर्मचार्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे.
मुकुंदनगर, दर्गादायरा, फकिरवाडा या भागातील डेंग्यू व इतर संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या. कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांचे निलंबन करावे. आजाराने नागरिकांची झालेल्या वित्तहानीची नुकसान भरपाई संबंधीत अधिकार्यांकडून वसूल करुन देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
|










