मराठा संघटनांचा क्रांतिदिनी मुंबईत मोर्चा; अहमदनगर: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी क्रांतिदिनी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्य...
अहमदनगर: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी क्रांतिदिनी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने मुंबईतून मोर्चा काढण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आले.
येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध संघटनांची बैठक पार पडली. मराठा चेंबर ऑफ कॉर्मसचे दिलीप पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, मराठा समन्वय कक्ष प्रदेशाध्यक्ष शांताराम कुंजीरी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण, अवधूत पवार, गोरख दळवी, सोमनाथ कराळे, गजेंद्र दांगट, अतुल लहारे, अवि भिंगारदिवे, लालू दळवी, राम गायकवाड, संदीप राजाळे, सोमनाथ कराळे आदी यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाला ओबीसीत समावेश करून आरक्षण मिळावे, यासह कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणार्या अत्याचाराबाबत आरोपींना कडक शासन करावे, अँट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करून गैरवापर करणार्यांवर पायबंद घालावा, शेती मालाला हमीभाव, शेतकर्यांचे कर्ज माफ करा आणि मराठय़ांच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे, अशी मागणी आंदोलनाव्दारे करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरले.
म










