सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त ४७८ रुग्णांची मोफत नेत्रतपासणी; अहमदनगर ; श्री संत सावता माळी उत्सव समिती व फिनिक्स फाऊंडेशनतर्फे ...
सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त
४७८ रुग्णांची मोफत नेत्रतपासणी;
अहमदनगर ;
श्री संत सावता माळी उत्सव समिती व फिनिक्स फाऊंडेशनतर्फे माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरात ४७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षका भाग्यश्री खेतमाळीस यांच्या हस्ते शिबिराचे उद.घाटन झाले. कोतवालीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, उत्सव समितीचे छबुनाना जाधव, नगरसेवक दत्ता कावरे, माधवराव भुतारे, जालिंदर बोरुडे, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर रासकर, बापुसाहेब शिंदे, बाबा पटवेकर, मंदार सटाणकर, जालिंदर निकम महाराज यावेळी उपस्थित होते. े.
, संत सावता माळी यांच्या पुण्यथितीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यातून समाजसेवा साधण्याचा उपक्रमाचे कौतुक आहे. अशा शिबिरांमुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचते. फिनिक्स फाऊंडेशनच्या कामाचे देखील यावेळी त्यांनी कौतुक केले. शिबिरातील ४८ रुग्णांवर पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. बाळु पुंड, महेश आंबेकर, माणिक बनकर, दत्तातय भुतारे, चंद्रकांत ताठे, गोरख वाघ, गणेश कोल्हे, सतीश पडोळे, अनिल पडोळे, कैलास खरपुडे, डॉ. रायकर, नितीन शेरकर, अशोक पुंड, पंकज भुतारे, सुभाष सांगळे, सतीश डागवाले, सद्दाम शेख, पोपट शिंदे, अनिल चेडे, श्रीकांत रासकर, सुरेश इवळे यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
|










