सायकलिंग व क्रॉसकंट्री स्पर्धेत 'न्यू आर्टस्'च्या खेळाडूंचे यश ; अहमदनगर; पारनेर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालय...
सायकलिंग व क्रॉसकंट्री स्पर्धेत
'न्यू आर्टस्'च्या खेळाडूंचे यश ;
अहमदनगर;
![]()
पारनेर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयात पार पडलेल्या पुणे विद्यापीठ सायकलिंग मुले, मुली आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत नगरच्या न्यू आर्टस कॉलेजने सलग पाचव्यांदा चॅम्पियनशीप मिळाली.
सायकलिंग रोडरेसच्या ४0 किलोमीटर स्पर्धेत न्यू आर्टसच्या आठ खेळाडूंनी विजय मिळवला. विकास रोठे, अंकुश साबळे, रियाज शेख, गोदावरी शिंदे, पल्लवी शिंदे, मोनिका शिंदे, ऋतुजा भापकर, सोनाली वाघ, संतोष वायभासे यांनी हे यश मिळविले. त्यांची आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे विद्यापीठ आंतर महाविदद्यालयीन कॉसकंटी मुलीच्या स्पर्धेत कॉलेजमधील तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. पाथर्डी येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. यामध्ये मुलांमध्ये भिवा झिटे याने १२ किलोमीटर अंतर ४४ मिनिटांत पार पाडले. ऐश्वर्या कल्याणकर हिने सहा किलोमीटरचे अंतर २२ मिनिटांत पार पाडून प्रथम क्रमांक पटकवला. श्रद्धा वामन श्रद्धा हिने हेच अंतर २४ मिनिटांत पार केले. या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. शा. शि. संचालक प्रा. डॉ. शरद मगर, प्रा. धन्यकुमार हराळ, प्रा. धनंजय लोटे यांचे या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे (आबा), उपाध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अँड़ दीपलक्ष्मी म्हसे, खजिनदार रामचंद्र दरे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. एस. एस. जाधव, उपप्राचार्य डॉ. एम. व्ही. गीते, उपप्राचार्य आर. जी. कोल्हे यांनी या यशाबद्दल कौतुक केले आहे.
|










