दुष्काळी अनुदान देण्याची शेतकर्यांची मागणी; शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांचे दुष्काळी अनुदान देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे. ...
शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांचे दुष्काळी अनुदान देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे. राज्य शासनाने ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असणार्या गावात दुष्काळ जाहीर केला केला होता.
यामध्ये शेवगाव तालुक्यातील १११ गावांमध्ये ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी लागल्याने संपूर्ण शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर झाला होता. दुष्काळग्रस्त गावांतील प्रत्येक शेतकर्यांना सरसकट अनुदान देण्याचे सरकारने कबूल केले होते. त्यानुसार तालुक्यातील खरिपामध्ये येणार्या ३४ गावांतील शेतकर्यांना ६ महिन्यांपूर्वीच अनुदानाचे वाटप करण्यात आले. मात्र, रब्बीचे अनुदान अजूनही तालुका पातळीवर उपलब्ध न झाल्याने ते मिळेल की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत. गेली २ ते ३ वर्षांपासून पावसाने हुकावणी दिल्यामुळे शेवगाव तालुक्यात पांढरं सोनं समजल्या जाणार्या कपाशी पिकाच्या उत्पादनापासून शेतकरी वंचित राहिलेला आहे.
त्यातच इतर पिकांपासून उत्पादन मिळाले नाही. शेतकर्यांनी अगोदरच कर्जबाजारी असताना उसणवार करून मोला महागाईची बी-बियाणे, खते व औषधे खरेदी करून हिमतीने लागवड व पेरणी केली. या काळातच तालुक्यातील रब्बीच्या ७९ गावांना सरसकट अनुदान मिळणे अपेक्षित होते. परंतु ते न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. तालुक्यातील सर्व का. तलाठयांनी शेतकर्यांच्या ८ अ क्षेत्राप्रमाणे याद्या तयार केल्या असून, अनुदान येताच तत्काळ ते बॅँकेत जमा करण्यात येतील, अशी तयारी करून ठेवली आहे. मात्र, अनुदानाबाबत जिल्हा पातळीवरच काही हालचाली झाल्याचे दिसून येत नसल्याने अनुदान मिळेल की नाही, अशी चर्चा शेतकर्यांमधून होत आहे.










