कर्हे घाटात भीषण अपघात; दोन जण ठार, १२ जखमी संगमनेर ; मृत्युघंटा म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाव...
कर्हे घाटात भीषण अपघात;
मृत्युघंटा म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर व संगमनेर शहरापासून काही अंतरावर असणार्या कर्हे घाटात स्कॉर्पिओ व होंडा कंपनीची (मोबिलिओ) कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात होंडा कारमधील दोन जण ठार झाले तर दोन्ही गाड्यातील इतर १२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नाशिक येथील सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना काल रविवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३0 ते १२ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, होंडा कंपनीची (मोबिलिओ) कार (क्र. एमएच ११ बीव्ही १९४२) नाशिकहून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. तर स्कॉर्पिओ (क्र. एमएच १२ एचएन ६७५६)ही गाडी पुणे जिल्ह्यातील शिरुर येथून संगमनेरमार्गे नाशिककडे जात असताना ही दोन्ही वाहने संगमनेरच्या जवळ असणार्या कर्हे घाटात समोरासमोर आली असता त्यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातात होंडा कारमधील हनुमंत भोसले (रा. नाशिक) व अशोक भोसले (ता. कोरेगाव, जि. सातारा) हे जागीच ठार झाले. तर यातील शोभा भोसले, नंदा भोसले, मधुकर भोसले, मधुशा मंगेश साळुंके, हरीष मंगेश साळुंके, चारुशिला मंगेश साळुंके (सर्व रा. ता. कोरेगाव, जि.सातारा) तर स्कॉर्पिओ कारमधील सिद्धेश्वर चंद्रकांत बगाडे, विवेक चंद्रकांत बगाडे, प्रसाद दिगंबर कळसकर, प्राजक्ता प्रसाद कळसकर, ज्ञानदा प्रसाद कळसकर व रमेश दगडू हिरवे (सर्व रा. ता. शिरुर, घोडनदी, जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शोभा भोसले, नंदा भोसले व मधुकर भोसले या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने
|










