चैतन्य कानिफनाथ पायी दिंडीचे करंजी येथे भव्य स्वागत ; करंजी / श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या दर्शनासाठी ज...
करंजी /
श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या दर्शनासाठी जाणार्या पायी दिंड्याचे प्रमाण वाढले असून, मोटेवाडी, ता. श्रीगोंदा येथील ओम चैतन्य कानिफनाथ पायी दिंडीचे करंजी येथे भव्य स्वागत करण्यात आले. मढी येथे पायी दिंडीचे शिस्तबद्ध नियोजन गेली अनेक वर्षांपासून माळशेज येथील काही कानिफनाथ भक्त करत आहेत. आता मोटेवाडीने यावर्षीपासून मढी पायी दिंडी उत्सव सुरू केला आहे. करंजीमार्गे कानिफनाथांच्या मार्गस्थ होणार्या दिंड्यामुळे नगर - पाथर्डी रस्ता भक्तिमय झाला आहे.युवानेते बंडू पाठक, महेश वाघ, अझरभाई पठाण, आदर्श ग्रामसेवक अनिल भाकरे, भीमशक्ती ग्रुपचे नवनाथ आरोळे, टायगर फोर्सचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, जीवासेनेचे सुनील पवार, गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चव्हाण, बाबा मोरे, माजी सरपंच भाऊसाहेब पाठक, राहुल अकोलकर , पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास मुखेकर यांनी या कानिफनाथ रथाचे येथे स्वागत केले.कानिफनाथ दिंडीचे करंजीत स्वागत(छाया- मयुर मुखेक










