आमदार राजळे यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासास निधी; पाथर्डी ; जायकवाडी धरणातून पाथर्डी शहरासाठी अडीचशे कोटी रुपयाची स्वतंत्र ...
पाथर्डी ;
जायकवाडी धरणातून पाथर्डी शहरासाठी अडीचशे कोटी रुपयाची स्वतंत्र पाणी योजना करणार आहोत. त्यासाठीची तांत्रिक बाबींची तयारीही सुरू आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला निधी पुरविण्याचे काम आमदार मोनिका राजळे यांच्याकडुन होत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजीव राजळे यांनी केले.
येथील कसबा विभागात जिजाई फांउडेशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती व माजी आमदार लोकनेते आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात राजळे बोलत होते. अध्यक्षस्थानी किसन काळोखे होते, नवृत्त उपजिल्हाधिकारी किशोर राजगुरु, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मृत्युजंय गज्रे, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, प्रवीण राजगुरु, अमोल गज्रे, भगवान साठे, विष्णुपंत अकोलकर, बजरंग घोडके, मंगल कोकाटे उपस्थीत होते.
यावेळी राजळे म्हणाले की, गरीबाच्या झोपडीत जन्माला येवून साहित्यिक आणि लोकशाहीर म्हणून ज्यांनी देशातील लोकांच्या ह्रदयावर राज्य केले. असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. सयुंक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख यांचे योगदान मौल्यवान आहे. प्रवीण राजगुरु यांनी जिजाई फाउंडेशनच्या माध्यामतून सुरु केलेलं सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. शहराच्या विकासात आम्ही काही बाबतीत कमी पडलो हे मान्य आहे. मात्र आगामी काळात ही उणीव भरुन काढु . शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, जॉगिंग पार्क ही कामे तातडीने सुरु करण्यात येतील. कसबा पेठेत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी निधी देवु, शैक्षणिक उपक्रमासाठी आमदार निधीतून निधी देण्याचे काम करु असेही राजळे म्हणाले. प्रस्ताविक प्रवीण राजगुरु यांनी केले, विनोद थोरात यांनी आभार मानले.










