महालक्ष्मी महायज्ञाचे १६ऑगस्टला आयोजन; अहमदनगर; धुनीवाले शिवानंद दादाजी व धुनी द्वारिका मैय्या यांच्या आशीर्वादाने महान धुनीवाले ...
महालक्ष्मी महायज्ञाचे
१६ऑगस्टला आयोजन;
अहमदनगर;
धुनीवाले शिवानंद दादाजी व धुनी द्वारिका मैय्या यांच्या आशीर्वादाने महान धुनीवाले धनंजय सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ऑगस्टला महालक्ष्मी महायज्ञ सोहळा नंदनवन लॉन येथे होत आहे. शिरीषकुमार लहाडे महाराज यांच्या हस्ते या सोहळ्य़ाच्या रथाचे उद.घाटन नुकताच झाले. वसंत लोढा, संयोजक शिवाजी लोंढे, राजेश मंचरे, संतोष मेहेर, मनीष लोढा, उमेश साठे, सागर शिंदे, प्रवीण मैड, दगडू गाडेकर आदी उपस्थित होते.
आपल्या सर्वांना संसार करताना किती तरी संसारिक, आर्थिक व मानसिक दु:खांना सामोरे जावे लागते. अशावेळी संसारसुखाचा शोध प्रत्येकजण घेत असतो. यातूनच नगरमध्ये भव्य महालक्ष्मी महायज्ञ सोहळा होत आहे.
या यज्ञ सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने नवदाम्पत्यांनी सहभागी व्हावे आणि समाजाला या यज्ञातून सुख, शांती व समृद्धी प्राप्त व्हावी, असे शिरीषकुमार लहाडे महाराज यांनी रथाचे उदघाटन करताना सांगितले. संयोजक शिवाजी लोंढे यांनी यज्ञाबद्दल माहिती दिली. या यज्ञ सोहळ्यात १00८ दाम्पत्य यजमानपद भूषविणार आहेत. ज्या भाविकांना या यज्ञ सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









