जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या नियुक्ती जाहीरआहे.अहमदनग र ; जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त करावयाच्या नामनिर्देशित सदस्य व विशेष नि...
जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त करावयाच्या नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रितांच्या नियुक्त्या राज्य सरकारने जाहीर केल्या. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी या माहितीला दुजोरा दिला. समितीवर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या चार व्यक्तींची नामनिर्देशित सदस्य म्हणून, तर चौदा व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, अनिल शिंदे, अशोक खेडकर, चंद्रशेखर कदम यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून, तर दिनकर गज्रे, बिपीन कोल्हे, बबन मुठे, वैशाली नान्नोर, राजेंद्र म्हस्के, बाबासाहेब सानम, नितीन कापसे, सुदाम सानप, रविंद्र सुरवसे, सुनील साळवे, अविनाश कोतकर, राजेंद्र दळवी, अभय शेळके, राजेंद्र झावरे यांचा जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमत्रिंत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
|










