झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सोहळा साजरा अहमदनगर ; वडगाव गुप्ता येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा सोहळा झाडाला राख...
झाडाला राखी बांधून रक्षाबंधनाचा सोहळा साजरा
अहमदनगर ;

वडगाव गुप्ता येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा सोहळा झाडाला राखी बांधून साजरा करण्यात आला. वृक्षावर प्रेम करा, वृक्ष आपले सगे-सोयरे आहेत, असा संतांनी दिलेला संदेश विद्यार्थ्यांना देत विद्यार्थ्यांच्या हातून झाडाला राखी बांधण्यात आली.
नगर शहरात सर्वत्र रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जात असताना गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या संचालिका उषाताई देशमुख व प्रि-प्रायमरीच्या संचालिका सौ.देविका देशमुख यांच्या संकल्पनेतून झाडाला राखी बांधण्याचे अनोखे नियोजन करण्यात आले. येथील नर्सरी ते इयत्ता ६ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी हस्तकौशल्याच्या तासाला स्वत:च्या हाताने तयार केलेल्या राख्या आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना बांधत रक्षाबंधन या पवित्र सोहळ्याचा आनंद लुटला. आपल्या वर्गातील बहिणीने राखी बांधल्याप्रित्यर्थ विद्यार्थ्यांनीही स्वत:च्या हाताने तयार केलेले भेटकार्ड बहिणीला देत एकमेकांचा स्नेहभाव वृद्धींगत करण्याचा प्रय▪केला. शाळेच्या प्रांगणात असलेल्या वृक्षाला इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी राखी बांधून आपल्या भावना व्यक्त केल्या. वृक्षाला बांधण्यासाठी ३ बाय २ फुटाची राखी तयार करण्यात आली होती. एकूण २५0 विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी प्रिन्सिपल नॅन्सीकॉल या उपक्रमाच्या इन्चार्ज सौ.कविता धावडे, अतुल ससे, जगदीश देशमुख यांच्यासह शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.









