अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य, साथीच्या आजारांना निमंत्रण पाथर्डी; शहर सध्या अस्वच्छतेच्या गर्तेत सापड...
अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली
शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य, साथीच्या आजारांना निमंत्रण
पाथर्डी;
शहर सध्या अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे. ठिकठिकाणी कचर्याचे ढिग साचलेले आहेत. दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. पालिकेचा स्वच्छतेचा ठेका केवळ पदाधिकारी व ठेकेदाराच्या फायद्यासाठी असल्याची भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.शहर स्वच्छ होईल की नाही असा मोठा प्रश्न शहरवासीयांना भेडसावत आह
शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्यविभागाचे कर्मचारी केवळ पदाधिकार्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. शहरात डुकरांनी उच्छाद मांडला आहे.नागरिकांना ते त्रास देत आहेत. लहान मुलांचा चावा घेवून जखमी करीत आहेत. पालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. शहरातील कचर्याच्या ढिगामुळे मोकळ्या जागा सार्वजनिक कचराकुंड्या झाल्या आहेत. उघड्यावर पडलेल्या कचर्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.या कचर्यामुळे डासांची संख्या वाढली आहे. शहरात डासांच्या निर्मूलनासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. मात्र याची बिले काढली जातात. ठेकेदाराला पदाधिकार्यांचे अभय असल्याची तक्रार सोमनाथ बोरुडे यांनी केली. अतिक्रमण धारकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.रस्त्यावरील अतिक्रमण तरी हटवावेत ही नागरिकांची मागणी पालिका का टाळते. पालिकेशी संबंधित असणारांचीच अतिक्रमणो जास्त आहेत का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. शहरात स्वच्छता करावी. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्याधिकारी यांनी सुरवातीला चांगले काम सुरु केले होते. त्यांनाही काही र्मयादा आल्या का असा प्रश्न उपस्थीत होत आहे. अतिक्रमण हटाव मोहीम का बारगळली. यामधे कोणाकडून काही आमिष दाखवले गेले की दमदाटी करण्यात आली अशी चर्चा सुरु झाली आहे.
विकासाची कामे ठप्प का आहेत. शहरवासीयांना पालिकेच्या पदाधिकार्यांकडून विकासबाबतीत खूप अपेक्षा आहेत. राजकारणाचे जनतेला काही घेणदेणं नाही. विकास व्हावा निधी शिल्लक असताना कामे का सुरु होत नाहीत. पालिका हे व्यक्तीगत हेवेदाव्याचे केंद्र बनत चालले आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. शहर स्वच्छतेकडे अधिकारी व पदाधिकार्यांनी तातडीने लक्ष द्यावे व जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरवाव्यात. अशीच अपेक्षा पाथर्डीवासीय करत आहेत.










