लाचेची मागणी करणार्या लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल अहमदनगर:श्रीरामपूर येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्थेतील मख्य लिपीक तुषार सदाशिव प...
लाचेची मागणी करणार्या लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर:श्रीरामपूर येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्थेतील मख्य लिपीक तुषार सदाशिव पवार,यांनी तक्रारदार यांचा सावकारी धंद्याचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी केलेले अर्ज प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. म्हणून त्यांच्या विरुद्ध आज दि. १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव व उगले, ला. प्र. वि. नाशिक परीक्षेत्र नाशिक, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक इरफान शेख, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत , पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, स.फौ. काशिनाथ खराडे, पोहेकॉ. सुनील पवार, कल्याण गाडे, राजेंद्र सावंत, वाव्हळ, पोना, प्रमोद जरे, नितीन दराडे, तनविर शेख, एकनाथ आव्हाड, प्रशांत जाधव, चालक पोहेकॉ. अंबादास हुलगे, ला. प्र. विभाग, अहमदनगर यांनी केली आहे










