हातगावातील युवकांचे दारूबंदीसाठी शर्थीचे प्रयत्न; हातगाव शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील परवानाधारक देशी दारूचे कायमस्वरुप...
हातगावातील युवकांचे दारूबंदीसाठी शर्थीचे प्रयत्न;
|
हातगाव
![]()
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील परवानाधारक देशी दारूचे कायमस्वरुपी बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी गावातील युवकांनी गेली दीड ते दोन महिन्यांपासून कंबर कसली असून, याबाबत १ ऑगस्ट रोजी महिलांची विशेष ग्रामसभा घेवून एकमुखी ठराव पारित करून घेतला आहे व पुढील कायदेशीर लढाई सुरु केली असून. ठरावानंतर दै.पुण्य नगरीच्या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे, तिचे फ्लेक्स बोर्ड बनवून गावातील प्रत्येक नागरिकास समजावे म्हणून संपूर्ण गावात लावले आहेत. दारूच्या आहारी गेल्यामुळे गावातील अनेक युवक मोठय़ा प्रमाणात व्यसनाधिन झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होवून रोज आपल्या कुटुंबातील पत्नी व मुलांना शिवीगाळ करून मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत.
त्याला आळा बसावा म्हणून गावातील सर्व युवकांनी याबाबत एकमुखी ठराव निश्चित करून दारुबंदी आंदोलन समितीच्या राज्य, जिल्हा व तालुका पातळवरील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून. त्यांना गावात बोलावून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटेखानी बैठका घेवून दारुबंदीबाबत तोटे या विषयावर मार्गदर्शन घेतले आहे.
तसेच सनदशीर मार्गाने गावाचे नावे असणारे देशी दारू दुकान कायमस्वरुपी कसे बंद होईल. यासाठी सर्वपक्षीय ४0 युवकांची दारुबंदी आंदोलन समिती स्थापन करून हाती घेतलेला प्रश्न धासस कसा लावता येईल. यासाठी शर्थीचे प्रय▪सुरु केले असून, येत्या २ ते ३ दिवसामध्ये राळेगणसिद्धी येथे जावून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेवून त्यांची गावात जाहीर सभा घेण्याचाही प्रप्रय▪चालू आहेत. याकामी महिलांनीही पुढाकार घेतला असून, त्यांचीही मोलाची मदत याकामी युवकांना मिळत आहे.
|










