'राज्य शासनाकडे निधीसाठी पाठ पुरावा सुरू' प्रभाग १ मध्ये पथदिव्यांचा लोकार्पण सोहळाअहमदनगर २५ वर्षांत रखडलेल्या विकासकाम...
प्रभाग १ मध्ये पथदिव्यांचा लोकार्पण सोहळाअहमदनगर
२५ वर्षांत रखडलेल्या विकासकामांचा डोंगर आमच्या डोक्यावर आला आहे. तो आम्ही आता सक्षमपणो पेलून विकासकामे मार्गी लावत आहोत. शहराच्या विकासासाठी नुसते मनपावर अवलंबून न राहता राज्य शासनाकडे विविध योजनांना निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. प्रभाग १ हा मोठ्या क्षेत्रफळाचा आहे. नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांनी घेतली पाहिजे. जो नगरसेवक विकासकामासाठी पाठपुरावा करतो, त्याच नगरसेवकाच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे होतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून प्रभाग १ मधील इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरात पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नितीन बारस्कर, गौरख कराळे, शशिकांत लोखंडे, रावसाहेब घुले, दत्तात्रेय काळे, बप्पाजी नाईक, सखाराम बोरुडे, भरत सुरतवाला, तुकाराम ननावरे, महावीर गांधी, शिवाजी जगताप, विश्वास बनसोडे, रमेश बनसोडे, गोरक्षनाथ व्यवहारे, मोहिते सर, कांडाळ, दिघे, भगवान लोखंडे, सुधीर भोगाडे, दीपक कुलकर्णी, राजू काळे, देवीदास लोळगे, ढवळेकर, शेलार आदींसह नागरिक उपस्थित होते.
श्री. जगताप पुढे म्हणाले की, संपत बारस्कर यांनी अल्पावधीतच विकासाच्या माध्यमातून आपले नाव समाजापुढे आणले आहे. ३.५ कोटींची विकासकामे प्रभागात आता सुरू आहेत. पुढील काळातही या उपनगराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
|










