स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचे मोठे बलिदान'; अहमदनगर साई एंजल्स इंटरनॅशनल स्कुलमध्ये संचेती हॉस्पिटलचे डॉ.अजय कोठारी व संस्थे...
स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचे मोठे बलिदान';
अहमदनगर
साई एंजल्स इंटरनॅशनल स्कुलमध्ये संचेती हॉस्पिटलचे डॉ.अजय कोठारी व संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव करपे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बॅंकेचे झोनल मॅनेजर सुधीर कुलकर्णी, संस्थेच्या खजिनदार सायली करपे, सौ.लता करपे हेही उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव करपे यांनी शाळेच्या कामकाजाची व शाळेची संपूर्ण माहिती दिली. कोठारी यांनी आपले विचार मांडतांना विद्यार्थ्यांना शाळेने चांगल्या सुविधा पुरविल्या आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मला आनंद वाटतो. देशातील चांगले व सुजाण नागरिक येथे घडतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी योगा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी इ. १ लीतील वीरधवल सुरवसे, इ. ४ थी तील श्रावणी काटे व वेदश्री देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी लेझीम, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत वंजारी व निशा पोपटानी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सूर्यकांत बंगारी यांनी मानले.










